शिवसेना जनतेच्या मनाचा आणि भावनांचा विचार करणारा पक्ष – नीलम गोऱ्हे

पुणे : एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे ४० बंडखोर आमदार आणि शिवसेना यांच्यात सध्या दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी उडताना दिसत आहेत. तर स्थानिक पातळीवर देखील शिवसेनेला गळती लागली आहे. शिवसेनेने उभे केलेले काम हे छोट्या छोट्या लोकांनी मध्येच काही प्रसंग निर्माण केल्याने थांबणार नाही. सामान्य जनतेच्या मनाचा आणि लोकभावनेचा विचार राजकारणात होणे अधिक महत्त्वाचे आहे. हाच विचार शिवसेनेत नेहमी होतो, असे प्रतिपादन नीलम गोऱ्हे यांनी केले.

दरम्यान नीलम गोऱ्हे म्हणाल्या, शिवसेना हा पक्ष छोट्या छोट्या लोकांमुळे निर्माण झालेल्या प्रसंगामुळे थांबणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. शिवसेना हा पक्ष सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम करीत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरात अनेक चांगल्या उपक्रमाची अंमलबजावणी होत आहे. शिवसेनेच्या शालेय साहित्य वाटप कार्यक्रमामुळे गोरगरीब कुटुंबातील पालकांना वेगळ्या अर्थाने मदत होत आहे, असं देखील नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

त्या पुण्यातील स्थानिक नगरसेवक राजू पवार यांनी आज शिवाजीनगर भागात आयोजित केलेल्या साहित्य वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, राजू पवार, संजय गवळी, करुम घाडगे आदी स्थानिक नेते यावेळी उपस्थित होते.

Prakash Harale: