रत्नागिरी | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी पुण्यामध्ये (Pune) रविवारी सभा घेतली होती. यामध्ये त्यांनी आपण अयोध्या दौरा (Ayodhya Tour) का रद्द केला?, त्यासोबतच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला. एकीकडे राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली तर दुसरीकडे शिवसेनेच्या एका आमदाराने राज ठाकरेंच्या भाषणाचं कौतुक केलं आहे.
राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणामध्ये अनेक अर्थ दडले होते त्यांचं भाषण हे गांभीर्याने घेण्याची गरज असून त्यावर विचार करण्याची गरज असल्याचं शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव (Shivsena MLA Bhaskar Jadhav) यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) हे भाजप खासदार बृहभूषन सिंह यांना गप्प करू शकत नव्हते का?, हे ते बोलले त्यामुळे महाराष्ट्रातून कोणीही अंगावर घेण्याची गरज नाही. महाविकास आघाडीच्या सर्वच लोकांना मी विनंती वजा आवाहन करेल की, कालचं राज ठाकरेंचं भाषण, त्यांचा रद्द झालेला अयोध्या दौऱ्याच्या मुद्द्याला कुणीही हवा देण्याचं काम करु नये, कुणीही चेष्टेचा विषय करु नये, असं भास्कर जाधव म्हणाले.
दरम्यान, भाजपचं खरं रुप काय, त्यांनी काढलेली नखं राज ठाकरेंनी वेळीच ओळखली त्यामुळे त्यांनी काल जे भाषण केलं ते राजकीय दृष्ट्या प्रगल्भतेनं आणि वैचारिक पद्धतीने घेण्याची गरज आहे. परिपक्व राजकारणी म्हणून त्या भाषणाकडे बघण्याची आवश्यकता असल्याचं जाधव यांनी सांगितलं.