अहमदनगर : (MP Sujay Vikhe Patil On NCP) राज्यसभेच्या सहा जागांच्या निवडणुकीत सहाव्या जागेवर भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा विजय झाला. धनंजय महाडिक यांचा हा विजय अनपेक्षित असाच होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा खेळ करणारा पक्ष आहे. शिवसेनेला संपवण्याचं काम राष्ट्रवादीकडून सुरू आहे, असा घणाघाती आरोप भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी केला आहे.
पुढे बोलताना विखे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी हे सर्व षडयंत्र पहावं आणि राष्ट्रवादीपासून दूर व्हावं. राज्यसभा निवडणुकीत झालेला पराभव हा अपक्षांमुळे नाही तर राष्ट्रवादीच्या खेळीमुळे झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला संपवण्याचं काम करत आहे. माझं भाकीत खरं ठरताना दिसतं आहे, असं खासदार सुजय विखे पाटील म्हणाले.
दरम्यान, महाविकास आघाडीकडून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी जोरदार रणनिती आखण्यात आली होती. पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चाणाक्यनितीनं राजकीय खेळी केल्यानं अखेर धनंजय महाडिक यांचा विजय झाला. या निवडणुकीत शिवसेनेला मोठा फटका बसला आहे, आणि संजय पवार यांचा पराभव झाला.