मुंबई | बिग बॉस मराठी 2 चा विजेता आणि हिंदी बिग बॉस 16 (Bigg Boss 16) चा उपविजेता ठरलेल्या शिव ठाकरेचा मोठा चाहतावर्ग (Shiv Thakare) आहे. त्याने रोडीज आणि त्यानंतर केलेल्या दोन्ही बिग बॉसमधून हा चाहतावर्ग कमावला. आणि आता तो रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) ‘खतरों के खिलाडी’ (Khatron Ke Khiladi) या कार्यक्रमात स्टंट करण्यासाठी सज्ज झाला आहे. लवकरच या कार्यक्रमाचं नवं पर्व सुरू होणार असल्याने या पर्वात कोणते स्पर्धक असतील याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. ‘खतरों के खिलाडी’ या कार्यक्रमात शिव ठाकरे सहभागी होणार असून या कार्यक्रमासाठी शिव ठाकरेने तगडं मानधन घेतलं आहे.
‘खतरों के खिलाडी 13’च्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. या पर्वात छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय कलाकार सहभागी होणार आहे. ‘खतरों के खिलाडी’च्या निर्मात्यांनी नव्या पर्वातील स्पर्धकांमध्ये शिव ठाकरेच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. शिव ठाकरेच ‘बिग बॉस 16’चा (Bigg Boss 16) विजेता असणार होता. पण काही कारणाने तो विजेता होऊ शकला नाही. ‘बिग बॉस 16’नंतर लगेचच शिवला ‘खतरों के खिलाडी 13’साठी विचारणा झाली. या कार्यक्रमात सहभागी होण्यास शिवनेदेखील होकार दिला.
‘खतरों के खिलाडी 13’साठी शिव ठाकरेने किती मानधन घेतलं?
‘खतरों के खिलाडी 13’च्या स्पर्धकांमधील शिव ठाकरे सर्वात महागडा स्पर्धक आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शिव ठाकरेची लोकप्रिय लक्षात घेत ‘खतरों के खिलाडी’च्या निर्मात्यांनी त्याला चांगलच मानधन दिलं आहे. एका एपिसोडसाठी त्याने 5-8 लाख रुपये घेतले आहेत”.
‘बिग बॉस 16’च्या घरातील शिव ठाकरे उत्कृष्ट खेळाडू होता. त्याची खेळी रोहित शेट्टी आणि निर्मात्यांच्या पसंतीस उतरली आणि लगेचच त्यांनी त्याला ‘खतरों के खिलाडी 13’साठी विचारलं. बिग बॉसच्या घरातील टास्क शिवने चांगले खेळले आहेत. ‘आपला माणूस’ म्हणून ओळख असलेला शिव अल्पावधीतच लोकप्रियता शिखरावर पोहोचला आहे. आता ‘खतरों के खिलाडी 13’ तो कसं खेळतो याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.