आता प्रेम वगैरे… रिलेशनशिपवर बोलला शिव ठाकरे, अप्रत्यक्षपणे केला वीणाचा उल्लेख

मुंबई | मराठमोळ्या शिव ठाकरेने (Shiv Thakare) ‘बिग बॉस मराठी’नंतर ‘बिग बॉस 16’मध्ये सहभागी होऊन त्याने त्याची छाप सर्वांवर पाडली. मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या सिजनचा विजेता ठरलेला शिव त्यावेळी त्याच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आला. शिव आणि वीणा जगताप (Veena Jagtap) यांच्या जोडीनं चाहत्यांची मनं जिंकली होती. दोघंही नात्यात होते. पण काही महिन्यांनंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या ब्रेकअपच्या मागचं कारण आजही चाहते त्यांना विचारत असतात. पण आता या चर्चांवर त्यानं मौन सोडलं आहे. शिव त्याच्या रिलेशनशिपवरही बोलला आहे.

मला माझ्या चाहत्यांना निराश नाही करायचं, त्यामुळं मी सध्या करिअरवर लक्ष देतोय, असं शिव म्हणला. ‘ मी सध्या माझ्या करिअरवर लक्ष देतोय, तेच सध्या माझं प्रेम आहे. जे काही प्रेम वगैरे करायचं होतं ते मी कॉलेजमध्ये असताना केलं. आता मला फक्त करिअर करायचं आहे. दरम्यान, शिवच्या या उत्तरानं त्याचे चाहते नाराज झाले आहेत. वीणासोबत असलेल्या नात्याचा उल्लेख केला नाही. शिव आणि वीणामध्ये जे नातं होतं ते फक्त बिग बॉस साठीच होतं का? असा प्रश्नही चाहते वितारत आहेत.

म्हणून नाकारले मराठी सिनेमे

शिव म्हणाला की, मला दोन चित्रपटांच्या ऑफर्स आल्या होत्या. हे दोन्ही मराठी सिनेमे होते. मोठ्या दिग्दर्शकांचे हे सिनेमे आहेत. या चित्रपटाचं शूटिंग एप्रिल महिन्यात सुरू झालं आहे आणि मे महिन्यात शूटिंग संपणार आहे. पण या चित्रटांना वेळ देणं शक्य झालं नाही. तारखा जुळत नव्हत्या. खतरों के खिलाडीसाठी मी शब्द दिला होता. आणि मला मनापासून हाच शो करावा वाटत होतं. त्यामुळं मी हा शो करतोय, असंही त्यानं स्पष्ट केलं.

Dnyaneshwar: