खतरो के खिलाडीच्या सेटवर शिव ठाकरेला दुखापत; व्हिडीओ केला शेअर

मुंबई | छोट्या पडद्यावरील खतरो के खिलाडी (khatron ke khiladi 13) या शो चे शुटींग सध्या आफ्रिकेत सुरु आहे. बिग बॉसमधील कलाकार शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि अर्चना गौतम (Archana Gautam) यांनी देखील या शोमध्ये भाग घेतला आहे. मात्र आत्ता खतरो के खिलाडी १३ च्या सेट वरून शिव ठाकरेच्या चाहत्यांसाठी एक बातमी समोर आली आहे.

नुकताच शिव ठाकरे याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हि़डीओमध्ये शिव ठाकरे याच्या हाताला मोठी दुखापत झाल्याचे दिसत आहे. धक्कादायक म्हणजे शिव ठाकरे याच्या हाताला अनेक टाके देखील पडल्याचे दिसत आहे. आता शिव ठाकरे याचा हा व्हिडीओ पाहून त्याच्या चाहत्यांमध्ये चितेंचे वातावरण बघायला मिळत आहे.

शिव ठाकरे याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो आरशाच्या समोर जबरदस्त लूकमध्ये दिसत आहे. मात्र, त्यानंतर शिव ठाकरे हा मोबाईलचा कॅमेरा आपल्या हाताकडे फिरवतो आणि त्याची जखम दाखवतो. यामध्ये शिव ठाकरे याच्या हाताला मोठी दुखापत झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. काही टाके टाकल्याचे देखील या व्हिडीओमध्ये दिसत आहे. शिव ठाकरेने शेअर केलेल्या या व्हिडीओमुळे चाह्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Dnyaneshwar: