…म्हणून पराभूत झालात का? शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना खोचक सवाल!

सातारा : (Shivendraraje Bhosale On Udayanraje Bhosale) दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांसोबत फोटो काढून चहापाणी घेऊन आणि शेकडो कोटींचे आकडे पेपरमध्ये छापून मतदारसंघाचा विकास होत नाही. तुम्ही खरचं किती निधी मान्य करुन आणला? एवढे मोठे महान विकासपुरुष आहात तर, मग लोकसभेत तुमचा पराभव करुन सातारकरांनी तुम्हाला विकासाची पोचपोवती दिली का? असा खोचक सवाल आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना केला आहे.

शिवेंद्रराजे म्हणाले, तुम्ही जिल्ह्याचे १५ वर्ष खासदार होता त्यावेळी संसदेत एक दिवसही उपस्थित नव्हता. पालिकेच्या कार्यकालास चार वर्ष आणि आठ- दहा महिने उलटले, निवडणूक लागली की लगेच बरी तुम्हाला केंद्रीय मंत्र्यांची आठवण होते. शेवटच्या महिन्यातच बरं विकासकामांचा पाठपुरावा सुरु होतो, मोठमोठ्या घोषणा होतात आणि याचेच कुतूहल सातारकरांना आहे, असा टोला शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंना लगावला आहे.

सातारा पालिकेत झालेला भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार सातारकरांनी उघड्या डोळ्यांनी पहिला आहे. नशीब, पालिका इमारत नागरिकांच्या मालकीची आहे नाहीतर ती सुद्धा तुम्ही आणि तुमच्या आघाडीने विकून खाल्ली असती. केंद्रात जाऊन निवेदने देताय, तसेच एक निवेदन पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनाही द्या आणि स्वतःच्या घरासमोरील रस्त्याचे काम तेवढे मार्गी लावा, असा टोला शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंना लगावला आहे. त्यांच्या या खोचक सवालाला उदयनराजेंकडून कशा प्रकारे उत्तर मिळणार हे पहाणे देखील तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे.

Prakash Harale: