पुणे | Maharashtra Kesari 2023 Final : नांदेडकडून खेळत असलेला पुण्यातील खेडचा पैलवान शिवराज राक्षे ठरला २०२३ चा ४६वा महाराष्ट्र केसरी. सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याला फक्त दीड मिनिटात महेंद्र गायकवाड चित करत हा डाव शिवराजने पटकावला. महेंद्र गायकवाड ठरला उपमहाराष्ट्रकेसरी. shivraj rakshe maharashtra kesari 2023 mahendra gaikwad pune
महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजेत्याला महिंद्रा थार जीप आणि पाच लाखांचे रोख बक्षीस मिळणार आहे. उपविजेत्याला ट्रॅक्टर आणि रोख अडीच लाखांचे बक्षीस मिळणार आहे. तर 18 वजन गटातील विजेत्यांना 18 जावा कंपनीच्या गाड्या देण्यात येणार आहेत.
पुण्यात (Pune) महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद अस्थायी समितीच्या मान्यतेनं संस्कृती प्रतिष्ठान आयोजित 65 वी मानाची कुस्ती स्पर्धा पार पडली. पुण्यातील कुस्ती महर्षी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी येथे महाराष्ट्र केसरीच्या (Maharashtra Kesari) मानाच्या गदेसाठी आज अंतिम फेरी (Final) पार पडली.
यावेळी महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) आणि सिकंदर शेख (Sikandar Shaikh) यांच्यात कुस्ती झाली. तीन मिनिटांच्या या पहिल्या फेरीत दोघेही आक्रमक खेळले. महेंद्र गायकवाडनं 5 तर सिकंदर शेखनं 4 गुण मिळवले. तसंच गुणांच्या फरकानं सिकंदर शेखवर महेंद्र गायकवाडनं विजय मिळवला.
यानंतर मॅटवरील कुस्तीत शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) आणि माजी महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर (Harshwardhan Sadgeer) यांच्यात लढत झाली. यामध्ये शिवराज राक्षेनं आक्रमक खेळ करत 6-0 अशा फरकानं आघाडी घेतली. त्यानंतर हर्षवर्धननं एक गुण मिळवला पण शिवराज राक्षेनं आणखी दोन गुण मिळवले. यामध्ये शिवराज राक्षेनं 8-1 अशा गुण फरकानं विजय मिळवला. त्यानंतर शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यात अंतिम सामना पार पडला.