पुणे : पुण्यातील वेताळ टेकडी (Vetal Tekadi) फोडून बालभारती ते पौड फाटा (Balbharati – Poud Phata) रस्ता तयार करायचा असा पुणे महानगरपालिकेचा (Pune Municipal Corporation) प्रस्तावित प्रकल्प आहे. या प्रकल्पाला पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला आहे. मागील महिन्यात अनेकदा पुणेकरा त्याविरोधात रस्त्यावर देखील उतरले होते. मनसेचे वसंत मोरे (Vasant More, MNS), राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील पुणेकरांची बाजू घेतली आहे. अशात आता शिवसेनेचे आदित्य ठाकरे यानी वेताळ टेकडीला भेट दिली आहे.
“पुण्यातील नदी सुधार प्रकल्प, वेताळ टेकडी, मुंबईतील (Pune) आरे, बारसू या सर्व ठिकाणी सध्या जी काही परिस्थिती दिसत आहे.त्यातून एकच म्हणावे लागले की, जनते विरुद्ध हुकुमशाही दिसत आहे. त्यामुळे पुण्यासह राज्यभरात जिथे कुठे प्रकल्प सुरू असतील त्या ठिकाणी स्थानिक नागरिकांच्या मनात त्या प्रकल्पाबाबत नेमक्या काय भावना आहेत हे महापालिका प्रशासनाने राज्य सरकारपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. त्यानंतरच पुढील पावले उचलली पाहीजे; अन्यथा एखाद्या दिवशी जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे पुण्यातील वेताळ टेकडी टिकली पाहिजे.” अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी वेताळ टेकडीला भेट दिल्यानंतर दिली आहे.