भाजप-शिवसेना एकत्र येणार का? पंकजा मुंडे म्हणाल्या…

बीड : (Shivsena-BJP Together On Pankaja Munde Statement) मागील महिनाभरातील नाट्यमय घडामोडींनंतर राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला यामुळं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दि. ३० रोजी शिवसेनेचे बंडखोर एकनाथ यांनी भाजपच्या मदतीनं नविन सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडनवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

दरम्यान, एका बाजूला १६ आमदारांच्या आमदारांच्या अपात्रतेच्या याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. तर दुसऱ्या बाजूला दुसरीकडं राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेना पाठिंबा देणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप एकत्र येण्याची चर्चा रंगू लागलं आहे. यावर बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

त्यानंतर पंकजा म्हणाल्या, असं झालं तर सर्वात जास्त आनंद मला होईल. शिवसेनेनं द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असेल, तर त्याचं स्वागत आहे. मात्र, पुढच्या गोष्टीवर आत्ताच विधान करणं घाईचं होईल. सध्याच्या वातावरणात कोणता पक्ष कुणासोबत आघाडी करेल, निवडणुकांमध्ये काय होईल? यावर आत्ताच भाष्य करणं चुकीचं ठरेल. दोन्ही पक्षांमध्ये शत्रुत्व राहू नये एवढंच मला वाटतं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

Prakash Harale: