शिवसेनेचे खासदारही बंडखोरीच्या तयारीत? ‘या’ कारणामुळं झालं सिद्ध!

मुंबई : (Shivsena PM in Up sent Uddhav thackeray meetting) एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचे ४० आमदार फोडून बंडखोरी केल्यानंतर शिवेसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले. यामुळं उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. ३० जुन रोजी शिंदे गटाने भाजपच्या मदतीनं सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदी तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदी शपथ घेतली.

दरम्यान, शिवसेना खासदार भावना गवळी, राहुल शेवाळे, राजेंद्र गावित यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा देण्याची विनंती केली. यापूर्वी घडलेल्या घटनांचा दाखला देत शिवसेनेनं एनडीएशी संबंध तोडून प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी (दोन्ही काँग्रेस नेते) यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता.

सोमवार दि. ११ रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना खासदारांची बैठक बोलावली आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पक्षाच्या भूमिकेवर चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या बैठकीत केवळ १० ते १२ खासदारांचीच उपस्थिती असल्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. आमदारांनतर शिवसेनेचे खासदारही एकनाथ शिंदेच्या संपर्कात असून बंडखोरी करण्याच्या मार्गावर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

Prakash Harale: