नवी दिल्ली : (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray Party Mashal symbol) चार महिन्यापुर्वी एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या 40 आमदारांनी पक्षाविरोधात बंडखोरी करत, थेट पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला. त्यानंतर शिवसेना आणि शिंदे गटातील वादामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे पक्षाला नाव तर मशाल हे चिन्ह देण्यात आलं होतं. यावर समता पक्षाने आक्षेप घेत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या चिन्हावर आपला अधिकार असल्याची समता पक्षाला न्यायालयात योग्य बाजू न मांडता आल्याने दिल्ली उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळण्यात आल्याचे न्यायमूर्ती संजीव नरुला यांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे.
निवडणूक आयोगाने शिवसेनेला दिलेल्या ‘धगधगती मशाला’ या चिन्हावर १९९६ पासून हे चिन्ह आपल्याडे असल्याचे समता पार्टीने दावा केला होता. मात्र, त्यांचा हा न्यायालयाने फेटाळून लावल्यामुळे मशाल हे चिन्ह ठाकरेंचेच राहणार यावर शिक्कामोर्तफ झाला आहे. यामुळे शिवसेना पक्षाला मोठा दिलासा मिळला आहे.