ठाकरे गटाचं आंदोलन! ‘सरकार आहे मिंध्यांचे, वांदे झालेत कांद्याचे’, या घोषणांनी पंढरपुर दणाणलं!

पंढरपूर : (Shivsena UBT On Eknath Shinde) सध्या राज्यातील कांदा (onion) उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांद्याच्या दरात मोठा घसरण झाल्यामुळं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. याच मुद्यावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या (ShivSena UBT) वतीनं पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील आढीव इथं पंढरपुर-कुर्डूवाडी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी सरकार आहे मिंध्यांचे, वांदे झालेत कांद्याचे’ म्हणत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. कांदा उत्पादक शेतकरी उध्वस्त करणं हे या सरकारचं धोरण आहे. हे शेतकरी विरोधी मिंधे सरकार शेतकऱ्यांचा घात करत असल्याची टीका शिवसेना तालुकाप्रमुख संजय घोडके यांनी केली. या सरकारच्या विरोधात आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन छेडू आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ असे घोडके म्हणाले.

सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत दगाबाजीचे धोरण अवलंबले आहे. कोणतीही अट शर्त न ठेवता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तत्काळ प्रति क्विंटल 500 रुपयांचे अनुदान त्यांच्या थेट खात्यामध्ये जमा करावे अशी मागणी युवासेनेचे नेते रणजित बागल यांनी केली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना परदेशी कांदा निर्यातीस लागणारा खर्च हा शासनाने उचलावा. कांदा निर्यातीस लागणारा कर देखील माफ करण्यात यावा. तरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. आगामी काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या माध्यमातून सदैव कटिबद्ध राहू असे सुतोवाच बागल यांनी केले.

Prakash Harale: