ठाकरे-वंचितची युती, बाळासाहेबांच्या जन्मदिनी युतीची घोषणा

मुंबई | Shivsena-VBA Alliance – शिवसेना (Shivsena) आणि वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) युतीची घोषणा शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त सोमवारी या युतीची घोषणा करण्यात आली. मुंबईतील आंबेडकर भवनात प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद सुरू आहे. ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut), सुभाष देसाई (Subhash Desai) तसेच वंचित बहुजन आघाडीकडून रेखाताई ठाकूर, अबुल खानसह आदी नेते या पत्रकार परिषदेत उपस्थित होते.

शिवशक्ती आणि भीमशक्तीचा राजकीय प्रयोग पहिल्यांदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातच झाला होता आणि आता शिवसेनेतल्या फुटीनंतर पुन्हा एकदा हाच प्रयोग होताना दिसत आहे. मात्र एकीकडे वंचित आणि शिवसेनेची (Shivsena) हात मिळवणी होत असली तरी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस मात्र यापासून अजुन दूर असल्याचं पाहायला मिळत आहे.

सध्या ही युती फक्त शिवसेनेसोबतच असून महाविकास आघाडीचं नंतर बघू, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या दोन्ही युतीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस साथ देणार का हेही पहावं लागेल. दरम्यान, पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. शरद पवार आमच्यासोबत येतील असी अशा बाळगतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमची युती स्वीकारतील ही अपेक्षा असल्याचं यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तर लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आहोत. मविआचे घटक म्हणून तुम्हाला मान्यता देण्यास हरकत नसल्याचं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Sumitra nalawade: