पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना; भाटघर धरणात पाच महिलांचा बुडून मृत्यू

भोर : तालुक्यातील भाटघर धरणात पाच विवाहित महिलांचा बुडून मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या सर्व महिला या कंजर भट समाजाच्या असून एक मुलगी सुदैवाने बचावली आहे. भाटघर धरणाच्या नऱ्हे गावच्या तीरावर गुरुवारी (ता.१९) सायंकाळी पाचच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. नऱ्हे गावातील कातकरी समाजाच्या तरुणाने तीन मृतदेह बाहेर काढले आहेत. या घटनेचे कारण आद्याप समोर आले नाही.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील, राजगड चे पोलीस निरीक्षक सचिन पाटील हे सहकाऱ्यांना सोबत घेऊना घटनास्थळी दाखल झाले. सह्याद्री सर्च अंड रेस्क्यू फोर्स च्या जवानांनी शोधकार्य सुरू केले आहे. खुशबू लंकेश रजपूत, वय १९ रा. बावदन, मनीषा लखन रजपूत वय २०, चांदणी शक्ती रजपूत वय २१, पूनम संदीप रजपूत वय २२, तिघी रा संतोषनगर हडपसर पुणे, मोनिका रोहित चव्हाण वय २३ अशी मृतांची नावे आहेत. पुढील तपास राजगड पोलिस करत आहेत.

Prakash Harale: