मुंबई | Shraddha Murder Case – सध्या श्रद्धा वालकर खून प्रकरणानं (Shraddha Walkar Case) देशात खळबळ उडाली आहे. श्रद्धाचा प्रियकर आफताब पूनावालानं (Aaftab Poonawala) तिची हत्या करून मृतदेहाचे 35 तुकडे केले. कोणाला संशय येऊ नये म्हणून आफताबनं ते तुकडे घरातील फ्रिजमध्ये ठेवले होते. तसंच ठराविक दिवसांनी तो श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे जंगल्यामध्ये फेकायचा. तब्बल सहा महिन्यांनंतर हे दृष्कृत्य आता उघडकीस आलं आहे. दिल्ली पोलिसांनी आफताबला अटक केली असून या प्रकरणावर तपास सुरू आहे. हा तपास जसजसा पुढे जात आहे तशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. यापार्श्वभूमीवर, श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर (Vikas Walker) यांनी आज (9 डिसेंबर) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपली व्यथा मांडली.
यावेळी विकास वालकर म्हणाले, श्रद्धाची हत्या झाली असून आम्हाला अत्यंत दु:ख आहे. यावेळी मला दिल्ली गव्हर्नर यांनी न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे. आतापर्यंत झालेल्या तपासाबद्दल दिल्ली पोलीस आणि वसई पोलीस यांचं काम संयुक्तपणे व्यवस्थित चाललं आहे. मात्र, अगदी सुरूवातीस वसई येथील तुळींज पोलीस स्टेशन यांच्या काही असहकार्याच्या भूमिकेमुळे मला बराच त्रास सहन करावा लागला. त्याबद्दल चौकशी व्हावी, जर तसं झालं नसतं तर आज माझी मुलगी जिवंत असती, किंवा काही पुरावे मिळण्यास मदत झाली असती.
मी आज माझी मुलगी श्रद्धा वालकर हिच्या मृत्यूबद्दल बोलणार आहे. मला दिल्ली गव्हर्नर यांनी आश्वासन दिलं आहे की ते मला न्याय मिळवून देणार आहेत. सोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची देखील मी भेट घेतली आहे. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे माझ्या घरी आले होते, तसंच त्यांनी निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांचेही आभार मानले आहेत, असंही विकास वालकर म्हणाले.
पुढे ते म्हणाले, आफताब पूनावाला याला कठोर शिक्षा व्हावी. तसंच आफताबच्या कुटुंबातील सदस्यांची सुद्धा चौकशी केली जावी, त्यांनाही शिक्षा द्यावी. या कटात जे कोणी सामील असतील त्याचा तपास करून त्यांना शिक्षा द्यावी, अशी मागणीही वालकर यांनी केली आहे.