श्रीकांत शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई : मागील काही दिवसांपासून मनसे, शिंदे गट आणि भाजपची तिसरी आघाडी होण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. शिंदे गट आणि मनसे यांची मने जुळतानाची चित्र आहेत. दिवाळीच्या सुरुवातीलाच राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दीपोत्सवानिमित्त एकत्र आले होते. तेव्हापासून राकीय वर्तुळात या तीनही नेत्यांच्या भूमिकांवरून चर्चा सुरु आहेत. दरम्यान, आज एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यानी राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली आहे.

शिंदे गटातील नेते, राज ठाकरे आणि भाजप नेते यांच्या दिवाळीतील भेटीगाठी या राजकीय नसल्याचं सांगितल्या जात आहे. दिवाळीनिमित्त या सदिच्छा भेटी घेतल्या जात असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, या भेटींमुळे या तीनही पक्षांची जवळीक वाढताना दिसत आहे. श्रीकांत शिंदे यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची आज भेट घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देत त्यांनी राज ठाकरेंना दिवाळीच्या सुभेच्छा दिल्या आहेत.

Dnyaneshwar: