भाजपचा सुर मावळला? कल्याणमधून मीच लोकसभा लढणार श्रीकांत शिंदेंचा दावा, ‘मनसे’लाही दिलं आव्हान

डोंबिवली : (Shrikant Shinde On Raju Patil) आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभेची जागा कोण लढवणार यावरून मात्र रणकंदोळ माजले आहे. एककिडे भाजप या मतदारसंघावर दावा करत असतानाच मनसेने देखील येथून लढण्याची शक्यता वर्तवली आहे. यावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हाच या लोकसभेतून निवडणूक लढवणार व गेल्या वेळेस पेक्षा अधिक मतांनी निवडून येणार असे ठणकावून सांगितले. तसेच कल्याण लोकसभेची काही लोकांना काळजी वाटते मात्र त्यांनी काळजी करू नये असे म्हणत खासदार डॉ. शिंदे यांनी मनसे आमदार राजू पाटील यांचे नाव व घेता टोला लगावला आहे.

डोंबिवली मधील पाटीदार भवन येथे म्हाडा रहिवासी सेवा संघाच्या वतीने खासदार डॉ. शिंदे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी भाषणात विरोधकांवर सडकून टिका केली. विकास कामांविषयी ते बोलले मला माझ्या कामाचा समाधान आहे. मी त्याचा अभिमान करून घेणार नाही. काही लोकांना कल्याण लोकसभा मतदारसंघाची काळजी वाटते. मात्र त्यांनी कल्याण लोकसभेची काळजी करायची गरज नाही. हा डॉक्टर श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभेमधूनच उभा राहणार आणि गेल्या वेळेस अडीच लाखाच्या मताधिक्याने निवडून आला. नंतर साडेतीन लाखांच्या मताधिक्याने जिंकून आला.

काही लोकांनी पाच वर्षात ऑफिस देखील उघडलं नाही. लोकांना माहीतच नाही की त्यांना भेटायला कुठे जायचे एवढा मोठा प्रॉब्लेम आहे. पाच वर्षे लोकांनी जबाबदारी दिली पण पाच वर्षात आजपर्यंत काही कमावलं नाही. पाच वर्ष जबाबदारी दिल्यानंतर आता अजून मोठी स्वप्न पडायला लागली आहेत. स्वप्न पडायला काही हरकत नाही असे म्हणतानाच त्यांनी “मुंगेरीलाल के हसीन सपने” अशी टीका आमदार पाटलांवर केली. स्वप्न पाहिले पाहिजे पण त्याबरोबर हेही स्वप्न बघा की आजी याच्यापुढे माजी लागता कामा नये याचीही दक्षता घ्या. असा टोला त्यांनी आमदार पाटलांना लगावला.

Prakash Harale: