कोलंबो : रशिया युक्रेन युद्धाच्या चर्चेत उर्वरित जगात नक्की चाललंय काय?,हे कुणालाच माहिती नव्हतं. मात्र भारताबाहेर अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या श्रीलंकेत बरीच आर्थिक उलथापालथ झाल्याचा साधा मागमूसही कुणाला नव्ह्ता. अशातच श्रीलंकेतील आर्थिक परिस्थिती डबघाईला आल्याने जनतेत संतापाची लाट उसळल्याकी पहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर श्रीलंकन सरकारनं रविवारी रात्रीपासून सर्व सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर बंदी घालण्याचा अभूतपूर्व निर्णय घेतला आहे. फेसबुक, ट्विटर, व्हाॅट्सअप, युट्यूब सह अन्य सर्व लोकप्रिय समाजमाध्यमांचा यामध्ये समावेश आहे. इंटरनेटशी निगडीत घडामोडीबाबतच्या नेटब्लाॅक्सने ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
प्राप्त माहितीनुसार, रविवारी सरकारनं देशभरात ३६ तासांचा कर्फ्यू लागू केला आहे. संपूर्ण देशात विजेचा तुटवडा पडलेला असून जीवनावश्यक वस्तू विकत घेणंही सर्वसामान्यांच्या कुवतीबाहेरच झालं आहे. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी श्रीलंकेत तातडीनं सार्वजनिक आणीबाणी घोषित करणारं राजपत्र प्रसिद्ध केलं आहे. आर्थिक अराजकता निर्माण झालेल्या श्रीलंकेचा हा प्रश्न आणखी किती चिघळणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.