Shubman Gill ODI Ranking – सध्या स्टार क्रिकेटर शुभमन गिल (Shubman Gill) चांगलाच चर्चेत आहे. द्विशतकवीर शुभमन गिलनं (Shubman Gill) आयसीसीच्या क्रमवारीत (ODI Ranking) मोठी झेप घेतली आहे. विशेष म्हणजे त्यानं किंग कोहलीला मागे टाकत आयसीसीच्या क्रमवारीत टॉप 10 (Top 10) मध्ये एन्ट्री केली आहे. विराटच्या (Virat Kohli) क्रमवारीत एका अंकांनी घसरण झाली आहे. शुभमन गिलनं न्यूझीलंडविरोधात तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत 360 धावांचा पाऊस पाडला होता. यामध्ये त्यानं एक द्विशतक आणि एक शतक झळकावलं होतं. या कामिरीमुळे शुभमनला मालिकावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.
नुकतंच आयसीसीनं एकदिवसीय क्रमवारी जारी केली आहे. यामध्ये शुभमनला 20 गुणांचा फायदा झाला आहे. शुभमननं सध्या सहाव्या क्रमांकावर झेप घेतली असून विराट कोहली सातव्या स्थानावर घसरला आहे. तसंच आयसीसीच्या टॉप 10 फलंदाजामध्ये तीन भारतीय फलंदाज आहेत. विरोट कोहली आणि शुभमन गिल (Shubman Gill) यांच्याशिवाय रोहित शर्माही (Rohit Sharma) या क्रमवारीत टॉप 10 फलंदाजामध्ये सामील आहे.
दोन आठवड्यापूर्वी शुभमननं श्रीलंकाविरोधात झालेल्या मालिकेत धमाकेदार कामगिरी केली होती. या कामगिरीमुळे शुभमननं आयसीसीच्या क्रमवारीत 26 व्या स्थानावर झेप घेतली होती. त्यानंतर त्यानं नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरोधातील मालिकेत 180 च्या सरासरीनं 360 धावांचा पाऊस पाडला. या कामगिरीमुळे त्याला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला. तसंच आता त्यानं आयसीसीच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.