ठरलं! सिद्धरमय्याच घेणार कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, तर उपमुख्यमंत्री…

बंगळुरू | Karnataka New Chief Minister – गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. अशातच यासंदर्भातली मोठी बातमी समोर आली आहे. सिद्धरमय्या (Siddaramaiah) हे कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत तर डीके शिवकुमार (DK Shivakumar) यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद देण्याचा निर्णय पक्षानं घेतल्याची माहिती मिळत आहे.

एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर कर्नाटकात सरकार स्थापनेसाठी एकमत झालं आहे. शनिवारी (20 मे) बंगळुरूमध्ये नवनिर्वाचित सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे.

सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आज (18 मे) संध्याकाळी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यानंतर काँग्रेस नेते राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करतील.

Sumitra nalawade: