अखेर ‘भगव्या बिकिनी’ वादावर दिग्दर्शकाने स्पष्टच सांगितले; म्हणाले, ‘भगवा निवडण्याचे कारण…’

मुंबई | शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) हा चित्रपट रिलीज होण्याच्या काही महिन्यांपूर्वी हा चित्रपट बॉयकॉट ट्रेंडला बळी ठरला आणि त्याचा ट्रेलर रिलीज होताच चांगले वादंग उठले होते. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणे प्रदर्शित झाले तेव्हा दीपिका पदुकोणने (Deepika Padukone) घातलेली भगवी बिकिनी देखील वादाला कारणीभूत ठरली. त्या वादानंतर चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सातत्याने सोशल मीडियावर केली जात होती. इतकेच नाहीतर देशातही विविध ठिकाणी पठाण चित्रपटाच्या विरोधात आंदोलने करण्यात आली.

अखेर हा चित्रपट 25 जानेवारी रोजी रिलीज झाला. पठाण चित्रपटाने पहिल्याच दिवशी रेकाॅर्ड ब्रेक अशी कामगिरी करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. या चित्रपटाने पहिल्यादाच दिवशी जगभरातून तब्बल 100 कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन करत सर्वांना धक्का दिला. विशेष म्हणजे पठाण हा चित्रपट शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.

वादात सापडलेल्या बेशर्म रंग या गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने वाद निर्माण झाला होता. हिंदूच्या भावना दुखावल्याचा आरोप या चित्रपटावर करण्यात आला. मात्र, या वादादरम्यान शाहरुख खान किंवा चित्रपटाशी संबंधित कोणीच काही भाष्य केले नव्हते. शाहरुख खान हा सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसला.

शेवटी आता भगव्या रंगाच्या बिकिनीच्या वादावर पठाण चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सिद्धार्थ आनंद म्हणाले की, या बिकिनीच्या रंगाचा आम्ही फार काही विचार केला नव्हता. रंग चांगला दिसत होता आणि सूर्यप्रकाश होता, मागे पाणी आणि हिरवे गवत होते आणि भगवा रंग चांगला दिसत होता. यामुळे आम्ही भगवा रंग निवडला होता. निर्मात्यांनी हे स्पष्ट केले की हे काहीही जाणूनबुजून केले गेले नाहीये, असेही ते बोलले.

Dnyaneshwar: