आयुष्यात आपण अयशस्वी ह्यामुळे होत नाही, कारण आपण काही करीत नाही. आपण अयशस्वी ह्यामुळे होतो, कारण आपल्याला करायला खूप काही असते आणि आपण कुठूनही सुरुवात करत नाही, म्हणून पर्याय जेवढे कमी तेवढी निर्णय अचूकता जास्त. जर हे शक्य नसेल तर प्रत्येक पर्यायाचा अभ्यास करण्याइतका संयम अंगी असायला पाहिजे.
अतिविचार केल्याने होणारी कामेदेखील होत नाहीत किंवा लांबणीवर पडतात का? हो. याला Paralysis of Analysis अर्थात, अतिविश्लेषणामुळे येणारी निष्क्रियता म्हणतात. एक कोडं सोडवून पाहूया. समजा, तुमच्यासमोर ५ दरवाजे आहेत. तुम्ही कोणत्या दरवाजातून बाहेर पडणार?
पहिल्या दरवाजामागे आग लागलेली आहे. दुसर्या दरवाजामागे खूप जोरात आम्लवर्षा होतेय. तिसर्या दरवाजामागे निंजा योद्धा तुम्हाला मारायला तयार आहे. चौथ्या दरवाजामागे एक मोठा सिंह आहे, ज्याने मागच्या १ महिन्यापासून जेवण नाही केले आणि पाचव्या दरवाजामागे लाव्हारस आहे. कोडं समाप्त…!
आपल्यापैकी प्रत्येक जण कोणत्या दरवाजातून जाऊ – इकडून जाऊ की तिकडून जाऊ – इकडून गेले तर हे होईल – तिकडून गेले तर हे होईल, असा विचार करतील. कमीत कमी १० – १२ विचार मनात येऊन जातील आणि डोक्यात विचारांचा एक प्रकारे गोंधळ होईल. जेवढी विचारांची गोची होते तेवढा आपला घेतला जाणारा निर्णय चुकतो, कारण आपण प्रत्येक पर्यायाबद्दल व्यवस्थितपणे विचार करण्यास असमर्थ असतो. कोणता पर्याय चांगला आणि कोणता पर्याय खराब, हे आपण तेव्हाच ठरवू शकतो जेव्हा आपल्याकडे कमी पर्याय असतात किंवा प्रत्येक पर्यायाला नीट समजून घेण्याची संयमता असते.
वरील कोड्याचे उत्तर आहे : आपण चौथ्या दरवाजातून जाणार कारण ज्या सिंहाने मागच्या एक महिन्यापासून जेवण नाही केले तो नक्कीच मेलेला असेल ना! किती जणांनी ह्याचे उत्तर बरोबर दिले? आपले उत्तर ह्यामुळे नाही चुकले, की तुम्ही सिंहाचा विचार केला नाही. आपले उत्तर ह्यामुळे चुकले, कारण आपल्याकडे ५ दरवाजे असे ५ पर्याय होते. ह्यालाच Analysis of Paralysis अर्थात अतिविश्लेषणामुळे येणारी निष्क्रियता म्हणतात. त्याचं मुख्य कारण हेच असते, की ते जेव्हा काही गोष्ट खरेदी करतात, तेव्हा एकापेक्षा अनेक गोष्टींचा ते विचार करतात.
मी माझ्या वहिनींचा एक अनुभव सांगतो. आम्ही एके दिवशी अगरबत्ती घेत होतो. त्यांच्यासमोर जवळपास ७-८ वेगवेगळे पर्याय होते. त्या कोणता विचार करीत होत्या? ह्यांना गुलाब गंध आवडत नाही. शेजारणीकडे लवेंडर आहे. तपकिरी अगरबत्तीचा रंग निघून जातो. जांभळी दिसायला चांगली असते, पण वास चांगला येत नाही. पिवळा रंग आंबट आंबट वाटतो, जर एका महिन्यात पिवळी अगरबत्ती संपली नाही. निळा रंग मला आवडत नाही.
मला विचारलं, की कोणता घेऊ, मी उलट प्रतिप्रश्न केला,
देवासमोर अगरबत्ती लावतात आणि कोणती निवडलीच नाही, त्याचे
कारण त्यांनी अगरबत्ती निवडताना खूप जास्त पर्याय विचारात घेतले
होते, म्हणून हे सगळे झाले.
हेरॉल्ड गरीन म्हणतात, ‘चांगला परंतु जलदगतीने घेतला गेलेला निर्णय – सगळ्यांत बेस्ट कारण खूप उशिरा घेतला गेलेल्या निर्णयापेक्षा तो फायदेशीर असू शकतो.’