Sidharth-Kiara Wedding : सोशल मीडियावर सध्या सिद्धार्थ (Sidharth Malhotra) आणि कियाराच्या (Kiara Advani) लग्नाची सर्वत्र चर्चा होतेय. बॉलिवूडमधल्या या लोकप्रिय जोडीचं लग्न राजस्थानमधील जैसलमेर येथे होणार आहे. सूर्यगढ पॅलेसमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. सिद्धार्थ-कियाराचे चाहते त्यांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी उत्सुक आहेत. यादरम्यान लग्नाच्या भन्नाट मीम्सचा वर्षाव होतोय. हे मीम्स पाहून तुम्हीलाही हसू आवरणार नाही.
बॉलिवूडमधल्या मोठ्या सेलिब्रिटींच्या लग्नाच्या वेळी नेहमीच सोशल मीडियावर मीम्सचा पूर येतोय. याआधी रणवीर सिंग-दीपिका पदुकोण, विकी कौशल-कतरिना कैफ, रणबीर कपूर-आलिया भट्ट यांच्या लग्नाच्या वेळीही मीम्सना उधाण आलं होतं. त्यामुळे आता सिद्धार्थ-कियारासुद्धा अपवाद ठरले नाहीत.
कियारा अडवाणीचे खरे नाव आलीया आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीत आधीच एक आलिया असल्याने कियारा अडवाणीने तिने तिचं नाव बदलून कियारा असं ठेवले आहे. मीम्स व्हायरल होण्याच कारण म्हणजे कियाराचा होणारा पती सिद्धार्थ मल्होत्राने तिच्याआधी अभिनेत्री आलिया भट्टला डेट केलं होतं. त्यामुळे नावातील हा योगायोग नेटकऱ्यांनी अचूकपणे शोधून काढला आहे.