Sidharth-Kiara Wedding : तर ठरलं… ‘या’ दिवशी होणार किआरा आणि सिद्धार्थचे लग्न

Sidharth MalhotraKiara Advani Wedding : 2023 या वर्षात बॉलिवूडचे आणखी एक जोडपे लग्नबंधनात अडकणार आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात शेरशाह कपल, सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) ​​आणि किआरा अडवाणी (Kiara Advani) हे लग्न करणार असल्याची माहिती मिळाली आहे. प्रसिद्ध सेलिब्रेटी फोटोग्राफर पापाराझी विरल भयानी (Viral Bhayani) यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवरून खुलासा केला आहे. 4 ते 6 फेब्रुवारी दरम्यान लग्न होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की बहुप्रतिक्षित हा लग्न सोहळा जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये होणार आहे.

पापाराझी विरल भयानी यांनी गुरुवारी एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये सांगितले आहे की, त्यांची टीम लग्नातील सर्व सर्व कार्यक्रम कव्हर करण्यासाठी जैसलमेरला रवाना होत आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्टमध्ये लिहिले की, “आम्ही कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्न कव्हर करण्यासाठी जैसलमेरला जात आहोत. 4 ते 6 फेब्रुवारीला सूर्यगड पॅलेसमध्ये लग्न होणार आहे.”

Dnyaneshwar: