दिल्ली | Sidhu Moose wala’s Killer Found – प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose wala) यांची दि. २९ मे रविवार रोजी भरदिवसा निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार यावेळी त्यांच्यावर ३० राऊंड होईपर्यंत गोळीबार करण्यात आला. या हत्येप्रकरणी आता दिल्ली आणि पंजाब पोलिसांकडून (Punjab Police) गती देण्यात आली आहे. मुसेवाला यांची हत्या केल्यानंतर गुन्हेगार नेपाळमध्ये लपलेले असावेत, असा संशय पोलिसांना होता.
दरम्यान, त्याप्रमाणे पोलिसांकडून तपासाची सुत्रे हलवण्यात आली. त्यातून सिद्धू मुसेवला यांच्यावर गोळ्या मारणाऱ्या शार्प शुटरची माहिती समोर आली आहे. संशयित शार्प शुटर ‘सोनीपत’ (Sonipat) या ठिकाणचे रहिवासी असून, त्यांच्या मुसक्या आवळत पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
या सर्व प्रकरणाची सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना माहिती मिळाली आहे. माहितीनुसार, बोलेरो जीप पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्यासाठी थांबते. त्यावेळी जीपमधून दोन अज्ञात व्यक्ती खाली उतरतात. प्रियव्रत फौजी आणि अंकित सेरसा ही या दोन शुटरची नावे आहेत. १८ मार्च २०२१ रोजी सोनीपतमध्ये गँगस्टर बिट्टू बरोनाच्या वडिलांच्या हत्येत प्रियव्रत फौजी सहभागी होता. अशी माहिती देखील समोर येत आहे.