Asian Games 2023 | भारताची नेमबाज सिफ्ट कौर सामरानं (Sift Kaur Samra) अभिमानास्पद कामगिरी केली आहे. आशियाई स्पर्धेमध्ये सिफ्ट कौरनं सुवर्णपदक (Gold Medal) पटकावलं आहे. त्यामुळे आता भारताच्या खात्यात 18 व्या पदकाची भर पडली आहे. 50 मीटर रायफल स्पर्धेत सिफ्ट कौरनं सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे.
एकीकडे सिफ्ट कौरनं सुवर्णपदकाची कमाई केली असताना दुसरीकडे भारताची नेमबाज आशी चौक्सीनं कांस्यपदक पटकावलं आहे. त्यामुळे भारताच्या खात्यात 5 सुवर्ण, 5 रौप्य आणि 8 कांस्यपदक अशी पदकं आली आहेत.
सिफ्ट कौरनं 50 मीटर रायफल इव्हेंटमध्ये दमदार कामगिरी करत देशाला पाचवं गोल्ड मेडल मिळवून दिलं आहे. तर चीननं दुसऱ्या क्रमांकावर राहत रौप्यपदक पटकावलं आहे. त्याचबरोबर 50 मीटर रायफल इव्हेंटमध्ये भारताच्या आशी चौक्सीनं कांस्यपदक आपल्या नावे केलं आहे.