राणा दाम्पत्याच्या घराबाहेर गोंधळ घालणाऱ्या सहा शिवसैनिकांना अटक

मुंबई : राणा दाम्पत्याच्या मुंबईतील घराबाहेर गोंधळ निर्माण केल्याप्रकरणी खार पोलिसांनी सहा शिवसैनिकांना अटक केली आहे. याप्रकरणी काल त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तसंच इतर आरोपींचाही पोलीस शोध घेत आहेत, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. 

दरम्यान, खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा वाचणार असल्याची घोषणा केली होती. यापार्श्वभूमीवर राणा यांच्या घराबाहेर शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर गोळा झाले होते. यावेळी त्यांनी पोलिसांनी लावलेली बॅरिकेट्सवर चढून राणा यांच्या घरामध्ये घुसण्याचा आणि गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी खार पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केल्यानंतर त्यांनी पोलिसांत निवासस्थानी गोंधळ घालणाऱ्या शिवसैनिकांविरोधात तक्रारही दिली होती.

Sumitra nalawade: