नारायण राणेंना कथित अनधिकृत बांधकाम प्रकरणात किंचित दिलासा

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या बंगल्यातील कथित अनधिकृत बांधकामासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाकडून (Bombay High court) किंचित दिलासा मिळाला आहे. राणे यांच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम प्रकरणात उच्च न्यायालयाकडून आज सुनावणी पार पडली. पुढील दोन आठवड्यांत संबंधित प्रकरणावर कसलीही कारवाई न करण्याचे निर्देश मुंबई महापालिकेला न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

राणे यांनी मुंबई महापालिकेकडे केलेला अर्ज आणि उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका याबाबत महापालिकेने पुढील दोन आठवड्यांत सविस्तर पत्र सादर करून माहिती देण्याचे निर्देश देखील महापालिकेला दिले आहेत.

महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या माहितीवर राणे यांनी एका हप्त्यात आपली बाजू मांडवी. या काळात राणे यांनी बंगल्यात कोणतेही अनधिकृत काम करू नये असेही आदेश न्यायालयाने राणे यांना दिले आहेत.

Dnyaneshwar: