अरेरे, इज्जतीचा फालुदा! स्मृती मंधानाचा पगार बाबर आझमपेक्षा दुप्पट; सोशल मीडियावर मीम्स व्हायरल

नवी दिल्ली : (Smriti Mandhana And Babar Adam Mims Viral) महिला प्रीमियर लीगचा पहिला मेगा लिलाव सोमवारी संपन्न झाला. या लिलावात एकूण पाच संघांनी सुमारे ६० कोटी रुपये खर्च करून ८७ खेळाडूंना खरेदी केले. जगात सध्या अनेक क्रिकेट लीग सुरू आहेत, ज्या महिलांसाठी आहेत. पण प्रत्येकजण महिला प्रीमियर लीगची वाट पाहत होता, कारण भारताच्या क्रिकेट बाजारात पैशांचा पाऊस पडतो आणि तसे घडले. १३ फेब्रुवारी हा दिवस क्रिकेट जगतासाठी ऐतिहासिक ठरला. या दिवशी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये महिला प्रीमियर लीग (WPL) च्या पहिल्या सत्राचा लिलाव झाला.

भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हिला मुंबई इंडियन्सने १.८० कोटींमध्ये करारबद्ध केले, तर RCB ने लिलावात भारताची उपकर्णधार स्मृती मानधना नंतर ऑस्ट्रेलियाच्या एलिस पेरीवर स्वाक्षरी केली. महिला प्रीमियर लीगच्या लिलावात बंगळुरूचा खर्च पाहता चाहत्यांनी सोशल मीडियावर एक नवीन मोहीम सुरू केली आहे. महिला आयपीएल आणि पाकिस्तान क्रिकेट लीग यांची तुलना करून लोकांनी बाबर आझमला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. पाकिस्तान सुपर लीगमध्ये तो सध्या पेशावर झल्मीकडून खेळत आहे आणि त्याला प्रत्येक मोसमात १.५० लाख डॉलर मिळत आहेत, पाकिस्तानी रुपयानुसार ही रक्कम ३.६० कोटींच्या पुढे जाते पण भारतीय रुपयात हि रक्कम मोजली तर ती १.५० कोटींपेक्षा कमी आहे. त्याच वेळी, भारताच्या स्मृती मंधानाला महिला प्रीमियर लीगमध्ये प्रति हंगाम ३.४० कोटी रुपये मिळत आहेत. तिला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विकत घेतले असून ती या संघाची कर्णधारही बनू शकते. महिला प्रीमियर लीगमध्ये ७ खेळाडू आहेत, ज्यांची किंमत २ कोटी किंवा त्याहून अधिक आहे. यातील तीन खेळाडूंना तीन कोटींहून अधिक रक्कम मिळाली आहे.

एका चाहत्याने ट्विट केले, “स्मृती मंधानाचा डब्ल्यूपीएल पगार आता बाबर आझमच्या पीएसएल पगारापेक्षा जास्त आहे. आणखी एका ट्विटर युजरने लिहिले, “पीएसएलमध्ये बाबर आझमची किंमत २.३० कोटी. स्मृती मंधाना ३.४ कोटी आणि ते पीएसएलची आयपीएलशी तुलना करतात.

Prakash Harale: