उत्तर भारतात हिमवर्षाव सुरू झाला असून, मैदानी भागात धुक्यासोबतच दिवस आणि रात्रीच्या तापमानातही झपाट्याने चढ-उतार होत आहेत. त्याचवेळी मान्सून परतल्याने दक्षिण भारतात पाऊस पडत आहे.
जम्मू-काश्मीर आणि हिमाचलमध्ये बर्फवृष्टी सुरू झाली आहे. साधना टॉप, गुरेझ, पीर पंजाल रेंज, पीर की गली, काश्मीर खोऱ्यातील कुपवाडामधील सोनमर्ग आणि लडाखच्या झोजिला पासमध्येही हंगामातील पहिली बर्फवृष्टी झाली. दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशचे मैदानी भाग प्रदूषण आणि धुक्याशी झुंजत आहेत.
बर्फाळ वाऱ्यांमुळे परिसरात थंडीचा प्रकोप वाढला. हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी आणि पाऊस झाल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. त्याचा प्रभाव आज राहील पण उद्यापासून हवामानात सुधारणा होईल. पुढील चार ते पाच दिवस हवामान चांगले राहील. येत्या काही दिवसांत तापमानात वाढ होणार आहे. काश्मीर भागात नवीन हिमवृष्टी झाली आहे. बर्फवृष्टीमुळे या भागातील वाहतूक विस्कळीत झाली आहे.