…म्हणून देवेंद्र फडणवीसांनी भर पत्रकार परिषदेत मागितली माफी, जाणून घ्या!

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर येत मुख्यमंत्रीपदाबाबत मोठी घोषणा केली आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी संध्याकाळी फक्त एकट्या एकनाथ शिंदेंचा शपथ सोहळा पार पडणार असल्याचं सांगितलं.

देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्रिपदी घोषणा केल्यावर माफी मागितली. कारण एकनाथ शिंदे यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे त्या सोहळ्याला कार्यकर्त्यांना उपस्थित राहता येणार नाही. भाजपचे कार्यकर्ते असो की एकनाथ शिंदे याचे शिवसैनिक असो कुणालाही शपथविधी सोहळ्याला प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे मी सर्वांची माफी मागतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्रीपदी शिंदेच्या नावाच्या घोषणा झाल्यावर त्यांनी ट्विट केले आहेत. हा वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळसाहेब ठाकरे यांच्या विचारांचा व धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिकवणीचा विजय…, असल्याचं शिंदे म्हणाले.

RashtraSanchar: