… म्हणून एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांकडून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूरांना विरोध

पुणे: आज केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेला म्हणजेच एफटीआयआयला भेट दिली. त्यावेळी एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांकडून ठाकूर यांना विरोध करण्यात आला. कारण जेव्हा जोधपूर दंगल, जहांगिरपुरी येथील पाडकाम अशा घटना घडत होत्या त्यावेळी अनुराग ठाकूर यांनी सामाजिक अशांतता निर्माण केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

तसंच ठाकूर यांनी निवडणुकीच्या प्रचार सभेत देशाच्या धर्मनिरपेक्षतेला धक्का पोचणार विधान केलं होत.‘देश के गद्दारों को, गोली मारों सालों को’ अशा शब्दात विधान केल्यामुळे एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांकडून विरोध होत असल्याचं सांगितलं जात आहे. एफटीआयआयने कायमच लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्ष आणि प्रागतिक वातावरणाचा पुरस्कार केला आहे. असं ‘एफटीआयआय विस्डम ट्री’ या फेसबूक पेज वरून विद्यार्थ्यांनी पोस्ट केली आहे.

Nilam: