…म्हणून मनसेकडून अक्षय तृतीयेचा महाआरती कार्यक्रम रद्द

मुंबई : उद्या (मंगळवार) मनसेनं अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर महाआरतीचं आयोजन केलं होतं. यासंदर्भातील आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना दिले होते. मात्र आता मनसेकडून हा महाआरतीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

उद्या रमजान ईद असल्यामुळे या सणासाठी व्यत्यय येऊ नये म्हणून हा कार्यक्रम रद्द करण्यात आला असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे मनसेचा महाआरती कार्यक्रम होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, रविवारी राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी भोंग्याचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला. जर ३ तारखेनंतर भोंगे खाली उतरवले नाही तर आम्ही दुप्पट आवाजात हनुमान चालिसा वाजवणार आहोत, असा इशारा त्यांनी परत दिला आहे. तसेच उद्या इस्लाम धर्मियांचा ईदचा सण आहे. त्याच मुहूर्तावर मनसेकडून राज्यभर महाआरती करण्यात येणार होती. पण ईद उत्सवामध्ये व्यत्यय नको म्हणून हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

Sumitra nalawade: