पुणे : आज पुण्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली आहे. त्यामध्ये त्यांनी औरंगाबादमध्ये ओवैसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचं केलेलं दर्शन आणि उत्तरप्रदेशमधले ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधामुळे झालेल्या चर्चेविषयी राज ठाकरे यांनी भर सभेतून विरोधकांना चांगलंच फटकारलं आहे. तसंच त्यांनी आपल्या पायाच्या आणि कंम्बरेच्या कारणामुळे आयोध्या दौरा स्थगित करत असल्याचं सांगितलं आहे.
राज ठाकरे म्हणाले कि,”आमच्याच महाराष्ट्रात MIM ची अवलाद येते आणि आमच्या शिवछत्रपतींना मारण्यासाठी आलेल्या औरंगजेबाच्या कबरीवर डोकं ठेवते आणि आम्हाला लाज, शरम काहीच वाटत नाही.”असं राज ठाकरे म्हणाले. तसंच त्यांनी शरद पवारांवरही निशाणा साधला “आमच्या शरद पवारांना औरंगजेब हा सुफी संत वाटतो तर काय बोलणार? तुमच्या सोयीसाठी इतिहास का बदलताय? त्याचबरोबर शरदपवार म्हणतात कि,अफजलखान हा आपला धर्म वाढवण्यासाठी आला होता तो शिवाजी महाराजांना मारायला आलाच नव्हता,पवारांच्या असल्या राजकारणामुळे निजामांच्या अवलादी महाराष्ट्रात वळवळी करू लागल्यात.”अशा शब्दांत राज ठाकरेंनी पवारांना टोला लगावला.
सभे दरम्यान, राज ठाकरे त्यांनी असदुद्दीन ओवैसी यांच्यावरही निशाणा साधला. जेव्हा ओवैसी महाराष्ट्रात आले तेव्हा औरंगजेबाच्या कबरीवर डोकं ठेवल तेव्हा आख्या महाराष्ट्र पेटून उठेल असं मला वाटतं होतं पण अशा घटना घडत असतानाही आपण थंड लोण्याचे गोळे बनून थंड पडलो होतो.जो शिवाजी महाराजांना मारण्यासाठी विजापूरहून आला. त्याच अफजलखानाची कबर आधी चार पाच फुटातच होती पण आता ती पंधरा ते वीस हजार फूटात झालाय आणि त्याला देणग्या देत आहोत. अशा शब्दात राज ठाकरे यांनी ओवैसी यांच्यावरही निशाणा साधला.