काय सांगता! …तर RCB संघ एलिमिनेटर सामना न खेळताच होणार बाहेर!

मुंबई | यंदाच्या आयपीएलच्या (IPL 2022) पर्वातील प्ले-ऑफमधील चार संघ मिळाले आहेत. यामध्ये पहिल्या स्थानावर गुजरात टायटन्स (Gujarat Titans) दुसऱ्या स्थानावर राजस्थान राॅयल्स (Rajsthan Royals) आणि तिसऱ्या स्थानी लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) तर चौथ्या स्थानी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) आहे. बंगळुरूचा संघाला नशिबाची साथ मिळाली. मुंबई संघाने दिल्ली कॅपिटल्स (Dehli Capitals) संघावर मिळवलेल्या विजयामुळे आरसीबीचा संघ प्ले- ऑफमध्ये दाखल झाला आहे.

प्ले- ऑफच्या सामन्यांसाठी बीसीसीआयने (BCCI) नियमावली जारी केली आहे. नव्या नियमानुसार, जर प्ले-ऑफचे सामने सुरू असताना खराब वातावरणामुळे सामना झाला नाही किंवा पावसामुळे जर मैदानावर सामनाच झाला नाहीतर यंदाच्या पर्वामध्ये साखळी सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या संघाला विजयी घोषित करण्यात येणार आहे.

राजस्थान वि. गुजरात

राजस्थान आणि गुजरात या संघांमध्ये पहिला सामना होणार आहे. मात्र जर यांच्यामध्ये एकाही चेंडूचा खेळ झाला नाहीतर गुजरात संघाला विजयी घोषित करण्यात येणार आहे. कारण साखळी सामन्यांमध्ये गुजरात संघ गुणतालिकेमध्ये पहिल्या स्थानावर होता.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. लखनौ सुपर जायंट्स

कोलकाता येथे एलिमिनेटरचे सामने होणार आहेत. त्यांच्यातही जर एकाही चेंडूचा खेळ झाला नाहीतर लखनौ संघाला विजयी घोषित करण्यात येणार आहे. मागील दोन दिवसांपासून कोलकाता येथील वातावरण खराब आहे. काही प्रमाणात पाऊसही आहे त्यामुळे या सामन्यांवर मोठं संकट आहे.

Nilam: