मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तांतर झालेलं असून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. अडीच वर्ष स्थापन झालेल्या या सरकारचे शिल्पकार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद का दिलं?, यावर खुलासा केला आहे.
शरद पवार यांनी आपल्याला मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी घ्यायला लावली असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले होते. याचाच धागा पकडत शरद पवारांना पत्रकारांनी प्रश्न केल्यावर पवारांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, कोणी काही सुचवलेलं नव्हतं, शेवटी हे सरकार चालावं अशी अपेक्षा होती. त्यामुळे तीन पक्षांना मान्य होईल अशी व्यक्ती असावी यासंदर्भात चर्चा झाल्यानंतर उद्धव ठाकरेंचं नाव आल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.