‘…तर आम्ही कुठंही नमाज पढू, हनुमान चालिसा म्हणू’; राजू शेट्टींचा राज ठाकरेंवर निशाणा

नांदेड : सध्या राज्यात मशिदींवरील भोंग्यांवरुन आणि हनुमान चालिसेवरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तसंच याच मुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय. यासंदर्भात आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते आज नांदेडमध्ये माध्यमांशी बोलत होते.

मनुवादी प्रश्न सुटले तर आम्ही कुठंही नमाज पढू, हनुमान चालिसा म्हणू, असंभव राजू शेट्टीचे प्रश्न सुटले आहेत. तसंच निवडक प्रश्न पडू लागले आहेत. नको त्या गोष्टींशी वाद निर्माण केला जात आहे. जोड आणि जातीय ध्रुवीकरण धार्मिक जात आहे, असा देखील त्यांनी केला आहे.

पुढे शेट्टी म्हणाले की, एकादशी दिवशी पंढरपुरात जमलेले लाखो भाविक पांडुरंगाचं दर्शन झालं की, जेवणासाठी चंद्रभागेच्या वाळूवर बसतात. तेथील मोकाट कुत्र्यांना त्या भाकऱ्यांवर फडशा पाडायचा असतो. मात्र, तिथं वारकरी असल्यानं कुत्र्यांना भाकऱ्या मिळविण्यासाठी धडपड करावी लागते. ही कुत्री एकमेकांत भांडतात. भुकूंन-भुकूंन कालवा करतात. भोळ्या भाबड्या वारकऱ्यांना हे पाहवत नाही. ते त्या कुत्र्याचं भांडण सोडवायला उठतात. त्याचवेळेस कुत्रे वारकऱ्यांची भाकरी घेऊन पसार होतात, अशीच काहीशी अवस्था आज महाराष्ट्रात झाली आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

Sumitra nalawade: