प्रेम करुया ‘खुल्लम खुल्ला’! लिंग परिवर्तन करुन शिक्षिका-विद्यार्थिनी रेशीमगाठीत!

जयपूर : (Social Media Viral Video’s) सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं, असं म्हटलं जातं. त्याचा प्रत्यय वेळोवेळी येताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका घटनेवरुन समोर आला आहे. त्यात प्रेमासाठी वाट्टेल ते करणाऱ्या एका शिक्षिकेनं लक्ष वेधून घेतलं आहे. एका महिला शिक्षिकेला आपल्याच विद्यार्थिनीवर प्रेम झालं. त्या प्रेमाचं रुपांतर लग्नातही झालं. मात्र त्यासाठी शिक्षिकेला मोठी किंमत चुकवावी लागली आहे.

दरम्यान, राजस्थानातील भरतपूरच्या एका शाळेतील शिक्षिकेनं जे केलं त्यामुळे काही स्तरातून तिचं कौतूकही होतं असून काहींकडून तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलही केलं जातंय. शिक्षिकेला आपल्याच शाळेतील एका विद्यार्थीनीवर प्रेम झालं. त्यानंतर त्यांनी एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णयही घेतला होता. दोन स्त्रियांचा विवाह ही गोष्ट दोन्ही बाजूच्या कुटुंबाच्या पचनी पडणारी नव्हती. त्यानंतर त्यांनी सर्वात धाडशी निर्णय घेतला.

त्यामुळे त्यांनी लिंग परिवर्तन करण्याची निर्णय घेवून त्यांनी तो पुर्णत्त्वास नेवून सगळ्यांनाच मोठा धक्का दिला आहे. कुटूंबियांसाठी तर ही धक्का देणारी बाब होती. लिंगपरिवर्तन करुन तिनं आपल्या विद्यार्थिनीशी संसार थाटला आहे. शिक्षिका असूनही आपण काय करतो आहोत त्यामुळे आपल्याला कोणत्या प्रसंगांना सामोरं जावं लागेल याची कोणतीही पर्वा त्या शिक्षिकेनं केली नाही.

Prakash Harale: