पुणे: दारू नको दूध प्या, मानवतेचा बोध घ्या… बाटली फोडा, दूध जोडा… दारुचा पाश जीवनाचा नाश… दारु सोडा आनंद जोडा… अशा संदेश देत कॉमन मॅनच्या साथीने तरुणाईने व्यसनमुक्तीचा संदेश दिला. नववर्षाच्या पूर्वसंध्येला आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र व महाविद्यालयीन तरुणाईने जनजागृती केली. नववर्षाचे स्वागत मद्यधुंद होऊन न करता चांगले विचार आणि संकल्प ठेवून करा, असे सांगत दूध वाटप करण्यात आले.
डेक्कन जवळील गुडलक चौक येथे आनंदवन व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्रातर्फे दारू नको, दूध प्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपक्रमाला कात्रज डेअरी, मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज आॅफ कॉमर्स आणि आपलं फाऊंडेशन यांनी सहकार्य केले. यावेळी केंद्राचे अध्यक्ष डॉ. अजय दुधाणे, दत्तात्रय सोनार, ऋषिकेश इंगळे,कृष्णा बाटाणे, विशाल शिंदे, सागर कांबळे, राहुल बॉम्बे, अनिरुद्ध आळंदी, संजय हिरवे, प्रकाश पवार, अमित शिंदे, कात्रज डेअरीचे चेअरमन बापू पासलकर, पांडुरंग कोंढाळकर, कुमार मारणे, मनोज लिमये, आपलं फाउंडेशनचे मनीष भोसले, अशोक टिहाळे, दीप गाठोळे, सिद्धी सावंत, एकता बोंबले, समृद्धी मैत्री, मराठवाडा वाणिज्य महाविद्यालयाचे दशरथ गावीत, प्रा. पुनम शिंदे, सिंहगड विधी महाविद्यालयाचे नितीन भंडारी, शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाचे डॉ. गजेंद्र ढमाले यावेळी उपस्थित होते.
डाॅ. अजय दुधाणे Dr Ajay Dudhane म्हणाले, नवीन वर्षाचा पहिला दिवस हा अतिशय महत्त्वाचा असतो. या दिवसाची सुरुवात चांगले संकल्प करून करायला हवी. परंतु व्यसनाधीनतेचे वाढते प्रमाण बघता तरुणाई नवीन वर्षाचे स्वागत ही दारू पिऊन करताना दिसते. यामुळे व्यसनाधीनता वाढत जाते. नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या पद्धतीने करावी आणि व्यसनाधीनतेची झालर नववर्षाच्या पूर्वसंध्येला नसावी यासाठी दूधाचे वाटप करून ‘दारू नको दूध प्या’ हा उपक्रम राबविला जातो.