‘या’ अभिनेत्रीला ओळखलंत का? व्हिडीओ पाहून तुम्हालाही भरेल धडकी

मुंबई | Sonalee Kulkarni – मराठी चित्रपटसृष्टीत आत्तापर्यंत सामाजिक, कौटुंबिक विषयांवरती भाष्य करणारे चित्रपट पाहायला मिळाले. तसंच आता बाॅलिवूड, हाॅलिवूडप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीतही भयपट येऊ लागले आहेत. यामध्ये आता एका नवीन मराठी भयपटाची चर्चा सुरू आहे. ‘व्हिक्टोरिया’ (Victoria) असं या चित्रपटाचं नाव आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे.

या चित्रपटाच्या कलाकारांचा फर्स्टलूक काही महिन्यांपूर्वीच समोर आला होता. तसंच आता यातील एका अभिनेत्रीने नुकताच तिचा एक लूक इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ती अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni). भयावह चेहऱ्याचा फिल्टर लावून सोनालीनं एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तसंच तिने या पोस्टमध्ये हा फिल्टर तिच्या चाहत्यांना वापरण्यास सांगितला आहे.

दरम्यान, येत्या 16 डिसेंबरला ‘व्हिक्टोरिया’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी सोबत अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) आणि आशय कुलकर्णी (Aashay Kulkarni) हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तसंच अभिनेता विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) हा या चित्रपटाच्या निमित्तानं दिग्दर्शनात पदार्पण करत आहे.

Sumitra nalawade: