मुंबई | सुप्रीम कोर्टा तुम्हा विनवणी, ऐकाव्या वेदना, संविधानाच्या कलमामधला हा आयोग लावतोय चुना, चार चौघात केलाय गुन्हा… सांगा चोरली कुणी शिवसेना ? हे गीत सध्या सोशल मीडीयावर व्हायरल झाले आहे. रत्नागिरीतील युवा कवी विकास लांबोरे यांनी हे गीत लिहिले असून गायले देखील आहे. सध्याच्या राजकीय घडमोडीवर भाष्य करणारं गाणं,उद्धव ठाकरे यांच्या वेदना धारदार शब्दात मांडणारं गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल राज्यातील जनतेत सहानुभूतीचं वातावरण निर्माण झालंय. त्याच भावना रत्नागिरीतील युवा कवीने शब्दातून उतरवल्या आहेत. शिवसेनेच्या सद्यस्थितीवरील कविता सादर करतानाचा व्हिडिओ या तरुण कवीने सोशल मीडियावर अपलोड केला आणि पाहता पाहता तो तुफान व्हायरल झालाय.
विकास लांबोरेची कविता
सुप्रीम कोर्टा तुम्हा विनवणी, ऐकाव्या वेदना
संविधानाच्या कलमामधला हा आयोग लावतोय चुना
चार चौघात केलाय गुन्हा… सांगा चोरली कुणी शिवसेना?
मराठी मुलखाचा अभिमान, शिवसेना अन् धनुष्यबाण
सत्तेचा हा माज कशाला.. विचारी जनता जनार्दन
सत्ताधाऱ्यांनो बाळगा लाज, जाणा लोकवेदना
चार चौघात केलाय गुन्हा, सांगा चोरली कुणी शिवसेना?
याची डोळा, याची देही, फोफावली ही हुकुमशाही
म्हणे जगात सर्वात मोठी, भारतात या लोकशाही
सरन्यायाधीश तुम्हा साकडं, वाचवा हो संविधाना
चार चौघात केलाय गुन्हा, सांगा चोरली कुणी शिवसेना?