नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड या प्रकरणावरून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना ईडी काढून नोटीस बजावण्यात आलं होत. परंतु त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. त्यामुळे त्यांना चौकशीसाठी पुढील तारिख देण्यात आली होती. त्यानंतर सोनिया गांधीना २३ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्य़ास सांगितलं होते. मात्र तब्बेतीच कारण देत सोनिया गांधी यांनी आता ईडीलाच पत्र लिहलं आहे.
आज सोनिया गांधी यांनी ईडी पत्र लिहिलं असून त्यामध्ये त्यांनी ईडीसमोर हजर राहण्यासाठी आणखी काही आठवड्यांचा अवधी मिळावा असं म्हटलं आहे. करोना आणि फुफ्फुसाच्या संसर्गातून पूर्णपणे बरी होईपर्यंत आराम करण्यासाठी वेळ मिळावा असं त्यांनी या पत्रात लिहलं आहे. याबद्दलची माहिती काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विटद्वारे दिली आहे. सोनिया गांधीना डॉक्टरांनी घरी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळॆ त्यांनी ईडीला पत्र लिहुन पूर्णपणे ठीक होईपर्यंत हजेरी पुढे ढकलण्यात यावी असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, गेल्या ६ दिवसांपासून राहुल गांधींची ईडी कार्यालयात चौकशी सुरु आहे. गेल्या पाच दिवसात तब्ब्ल ५४ तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली आहे. त्यावेळी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत जबाब नोंदवण्यात आले आहे. तसंच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून देखील त्याच्या ईडी कार्यालयात चौकशी दरम्यान आंदोलन करण्यात आली आहे. पण सध्या ईडीने कोणतेच नवीन समन्स जारी न केल्यामुळे त्यांची चौकशी संपली असल्याचं सांगितलं जात. आहे.