भारताचा ‘मसीहा’ सोनू सूदची दुबईतही चर्चा, कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

दुबई | Sonu Sood – प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) आज लोकांसाठी खरा हिरो बनला आहे. सोनूनं आत्तापर्यंत अनेक लोकांना मदत केली आहे. कोरानाच्या काळात आडचणीत सापडलेल्या प्रत्येकाला त्यानं मदत केली आहे. सोनूनं केलेलं हे काम आज कोणीही विसरू शकत नाही. आजही लोकं त्याच्याकडे मदत मागतात आणि तो देखील प्रत्येकाला मदत करण्याचा सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे सोनू सूद (Sonu Sood) भारतात चर्चेत होताच मात्र, आता तो दुबईमध्ये (Dubai) देखील चर्चेत आला आहे. दुबई विमानतळावर त्यानं एका व्यक्तीचे प्राण वाचवले आहेत. त्यामुळे तेथील कर्मचारी आणि प्रवाशांनी त्याचं कौतुक केलं आहे.

दुबई विमानतळावर सोनू सूद (Sonu Sood) इमिग्रेशन काउंटरवर थांबला होता. त्यावेळी अचानक एक व्यक्ती बेशुद्ध पडला. त्यावेळी त्या व्यक्तीला बघून तिथे कोणीही मदतीला पुढे आले नाहीत. पण सोनूनं ताबडतोब त्या माणसाचं डोकं पकडलं आणि त्याला आधार देत त्याला सीपीआर म्हणजे प्रथमोपचार दिले, त्यानंतर काही मिनिटांतच तो शुद्धीवर आला.

या घटनेनंतर सोनू सूदचं जोरदार कौतुक होताना दिसत आहे. आत्तापर्यंत त्यानं अनेक लोकांना आर्थिक मदत केली आहे. पण आज त्यानं चक्क जीव वाचवल्यानं सगळेच चकित झाले आहेत. त्यामुळे दुबईत त्याचं कौतुक होत आहे. सोनूचे फक्त चाहतेच नाही तर घटनास्थळी पोहोचलेल्या वैद्यकीय पथकानंही त्याचं कौतुक केलं आहे.

Sumitra nalawade: