मुंबई इंडियन्सने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला दिल्या खास शुभेच्छा; पाहा व्हिडीओ

मुंबई : आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा वाढदिवस आहे. गॉड ऑफ क्रिकेटर म्हणून ओळख असलेला भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आजपासून पन्नाशीत पदार्पण करतोय. वयाच्या १६ व्या वर्षापासूनच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या या दिग्गज खेळाडूला जगभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. तसंच आयपीएलच्या इतिहासामध्ये सर्वात यशस्वी ठरलेल्या मुंबई इंडियन्स या फ्रेंचायझीनेही मास्टर ब्लास्टरला एका व्हिडीओच्या माध्यमातून खास शुभेच्छा दिल्या आहेत.

सचिन तेंडुलकरने क्रिकेटच्या सर्वच प्रकारांमधून निवृत्ती घेतलेली असली तरी त्याची क्रेझ अजूनही कायम आहे. तसंच सध्या तो मुंबई इंडियन्सचा मार्गदर्शक म्हणून काम करतोय. त्याच्या प्रशिक्षणाखाली मुंबईचे तरुण आणि नवखे क्रिकेटपटू घडत आहेत. आयपीएल सुरु झाल्यापासूनच सचिन मुंबई इंडियन्स संघाशी जोडला गेलेला आहे. त्यामुळे मुंबईने त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘त्याने समस्त भारतीयांना क्रिकेट पाहण्याची प्रेरणा दिली’, असे म्हणत मुंबई इंडियन्सने सोशल मीडिया अकाऊंटवर सचिनसाठी एक खास व्हिडीओ पोस्ट केला आहे.

या व्हिडीओमध्ये मुंबई इंडियन्सचे तरुण खेळाडू सचिनबद्दल बोलताना दिसत आहेत. सचिनने त्यांना काय काय शिकवलं ? सचिनसोबत वागताना नेमका कोणता अनुभव आला ? सचिनचा स्वभाव कसा आहे ? आदी प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली आहेत. या व्हिडीओमध्ये देवाल्ड ब्रेविस, हृतिक शॉर्दीन, आर्यन जुवल आणि अर्जुन तेंडुलकर यांनी सचिनबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे सचिनसोबत पहिल्यांदा बोलणं झाल्यावर कसं वाटलं याचं तर या खेळाडूंनी खास वर्णन केलं आहे. मुंबई इंडियन्सने ट्विट केलेल्या या व्हिडीओची विशेष चर्चा होत असून हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Sumitra nalawade: