श्रीलंकेच्या पंतप्रधानांचा राजीनामा

कोलंबो : श्रीलंकेचे पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांनी अखेर पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे, अशी माहिती स्थानिक मीडियानं दिली आहे. अंतरिम सरकार स्थापन करण्याच्या विरोधकांच्या मागणीपुढं झुकत राजपक्षे यांनी हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. श्रीलंकेतील दिवसेंदिवस ढासाळत चाललेल्या आर्थिक परिस्थितीमुळं ६ मे च्या मध्यरात्रीपासून देशात पुन्हा एकदा आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.

दरम्यान, देशात गंभीर होत चाललेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षेंच्या विनंतीनंतर राजपक्षे राजीनामा देणार असल्याचे सांगितलं जात होतं. त्यानंतर आता राजपक्षे यांनी राजीनामा दिला आहे. महिंदा राजपक्षे यांच्या राजीनाम्यानंतर पुढील आठवड्यात मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याचं वृत्त कोलंबो पेजनं दिलं होतं.

Prakash Harale: