‘देशाला मजबूत आणि रचनात्मक विरोधी पक्षाची गरज’: श्री श्री रविशंकर

आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनचे संस्थापक भारतीय प्रसिद्ध अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी विरोधी पक्षाबद्दल मोठं विधान केलं आहे. भारतातील विरोधी पक्ष कमकुवत असल्याचं त्यांनी मत व्यक्त केलं आहे. निरोगी लोकशाहीसाठी रचनात्मक मजबूत विरोधी पक्षाची गरज आहे. असं ते म्हणाले.

सध्याचा विरोधी पक्ष खूपच कमकुवत आहे. भारताला मजबूत आणि रचनात्मक विरोधी पक्षाची गरज आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षात मजबूत नेतृत्वाची आवश्यकता असते त्याशिवाय देशात लोकशाही शासन असल्यासारखं वाटत नाही . अस रविशंकर यांनी मांडलं आहे. ते पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

मुलाखतीत ते म्हणाले की, “लोकशाहीला सशक्त विरोधी पक्षाची गरज असते. पण भारतात सध्या पुराणमतवादी किंवा सर्जनशील असा विरोधी पक्ष दिसत नाही. पण कोणताही राजकीय पक्ष भारतातील संस्थांमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, हे पश्चिम बंगालने मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांतून हे दाखवून दिलं आहे.” असं ते म्हणाले.

Dnyaneshwar: