दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात ?

मुंबई : दहावी परीक्षेच्या निकालाच्या (SSC Result 2023) तारखेसंदर्भात बोर्डाकडून लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. दहावीच्या परीक्षेचा निकाल हा जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. (SSC Results 2023 Date)

दहावीच्या निकालाची तारीख या आठवड्यात जाहीर होण्याची आहे. बोर्डाकडून निकालाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती आहे. बोर्डाकडून परीक्षांच्या निकालांसंबंधी सर्व तयारी पूर्ण झाली असून लवकरच तारीख जाहीर करण्यात येणार आहे. जुन्या पेन्शन योजनेच्या (Old Pension Scheme) मागणीसाठी सात दिवस पुकारलेल्या संपामुळे दहावी-बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल (SSC Result Date) उशिरा जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात होती.

मात्र संप मागे घेतल्यानंतर शिक्षकांनी हे काम प्राधान्याने हाती घेतल्याने बारावी बोर्ड परीक्षा निकाल वेळेत जाहीर झाला. त्यामुळे दहावीचा निकाल देखील वेळेतच जाहीर होण्याची शक्यता असल्याचे दहावी विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.

Dnyaneshwar: