आता लालपरीचेही दिसणार लोकेशन

एसटीच्या ताफ्यातील डीझेल वरील पाच हजार बस सीएनजीवर चालणार

चाकरमान्यांसह इतर प्रवासी प्रवास करण्यासाठी पहिली पसंती लालपरी म्हणजेच एसटी बसला  देतात. मात्र अनेकवेळा एसटी बस स्थानकावर बस येण्यास विलंब होतो. तर कधी पाहुणेमंडळी एसटी बसमधून प्रवास करत असताना त्यांचा फोनही लागत नाही. त्यामुळे एसटी बस नेमकी कुठे आहे असा प्रश्न सतावत असतो. मात्र आता या प्रश्नांना पुर्णविराम मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने  नवी सविधा उपलब्ध करुन दिली आहे. यामुळे आता प्रवाशांना त्यांच्या एसटी बसचे लोकेशन (ST Bus Location) घरबसल्या पाहता येणार आहे. ही नवीन यंत्रणा नववर्षापासून सुरु होणार आहे.

जीपीएस अ‍ॅपची सुविधा

आतापर्यंत महामंडळाच्या ताफ्यातील दहा हजार बसगाड्यांना ‘जीपीएस’ सिस्टिम बसविण्यात आली आहे. आता, त्या यंत्रेणीची सद्य:स्थिती काय, याची पडताळणी केली जात आहे. याशिवाय उर्वरित पाच हजार बसगाड्यांनाही ही यंत्रणा बसविली जाणार आहे. एसटी बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला किंवा काही अडचणीमुळे वेळेनुसार बस (Bus) स्थानकावर पोचायला विलंब होत असल्यास त्याची माहिती देखील त्या अॅपद्वारे समजणार आहे.

Rashtra Sanchar Digital: