मुंबई: (ST Bus Fare Hike) ऐन दिवाळीच्या तोंडावर काही कालावधीसाठी एसटी महामंडळाने भाडेवाढ जाहीर केली असून यामुळे सामान्यांच्या खिशाला मोठ्या प्रमाणावर झळ बसणार आहे. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सामान्य जनतेला आता या निर्णयामुळे आणखी खर्चाला सामोरे जावे लागणार आहे.
दरम्यान, दिवाळीच्या सणानिमीत्त एसटी महामंडळाकडून काही कालावधीसाठी बस तिकीटांचे दर वाढवण्यात आले आहेत, ही दरवाढ आज जाहीर करण्यात आली असून मागच्या काही दिवसात लालपरिचे झालेले नुकसान भरून काढण्याकरिता हा हंगामी निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे. २० ऑक्टोबर रात्री १२ वाजल्यापासून ही भाडेवाढ राज्यभर लागू होणार आहे.
राज्यातील प्रत्येक महामार्गवर ही दरवाढ करण्यात आली आहे. कमीत कमी 10-35 टक्के इतकी वाढ केली जाणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे. महामंडळाच्या या निर्णयामुळे सर्व एसटी प्रवाशांना झळ बसणार आहे.